Tuesday, April 14, 2020

सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्या 17 जणांवर कारवाई

उमदी,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उमदी पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरलेल्या एकूण 17  नागरिकांवर  188 प्रमाणे  गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत तसेच बाहेरून आलेल्या 7 लोकांवरती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 51 व कोव्हिडं -19 उपाययोजना 2020 च्या कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना होंमकॉर्टिन करण्यात आले आहे.
यापुढेही अशा प्रकारची  कारवाई करण्यात येणार असून  कोणीही आवश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये व सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा अन्यथा गुन्हा दाखल करून कोर्टात खटला पाठवून 5 हजार रु .दंडाची कारवाई करण्यात येईल. तरी पोलिसांकडून सर्वांना आवाहन आहे की जिथे असाल तेथेच रहा. कोणीही कोठेही फिरू नका व तोंडाला मास्क व हातामध्ये हॅन्डग्लोज वापरा.असे उमदी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. जी.कोळेकर यांनी आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment