Thursday, April 16, 2020

बेळगाव जिल्ह्यात एका दिवसांत17 रुग्ण

अथणी,(प्रतिनिधी)-
 केंद्र सरकारने बेळगाव जिल्ह्याला हॉटस्पॉट आणि राज्य सरकारने रेड झोनमध्ये समाविष्ट केल्याच्या काही तासांतच कोरोनाचा कहर झाला आहे . जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाचे 17 रुग्ण आढळले आहेत . त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 36 वर पोहोचली असून , संपूर्ण जिल्ह्यावर भीतीचे सावट गडद झाले आहे . गुरुवारी सापडलेल्या 17 रुग्णांपैकी एक रुग्ण मूळ गोव्याचा , एक मिरजेचा तर आणि एकटा विजापूरचा रहिवाशी आहे .
हे तिघेही दिल्लीच्या मर्कज धर्मसभेहून परतल्यानंतर एक महिन्यापासून रायबाग - कुडचीमध्ये वास्तव्यास आहेत . राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने गुरुवारी सकाळी कोरोनाबाधितांची माहिती जाहीर केली . त्यानुसार जिल्ह्यातील हॉटस्पॉट हिरेबागेवाडी येथे 7 जणांना , रायबाग तालुक्यातील कुडची येथील 7 जणांना तर येळ्ळूर , बागेवाडी आणि संकेश्वर येथील प्रत्येकी एकाला अशा एकूण 17 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे . यामध्ये 16 वर्षीय युवतीसह सात महिलांचाही समावेश आहे .

No comments:

Post a Comment