Thursday, April 16, 2020

उमदीत 20 पर्यंत कडकडीत 'लॉकडाऊन'

विजापूर, सोलापूरला कोरोना रुग्ण आढळल्याचा परिणाम
उमदी,(वार्ताहर)-
 कोरोणाच्या पार्श्वभूमीवर उमदी ता.जत येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मिळुन सलग पाच दिवस पुर्णत: दवाखाने व मेडीकल वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून लाँकडावुन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज पहीला दिवस पुर्ण गाव बंद ठेवून लोकांनी प्रतिसाद दिला. तसेच बंद कालावधीत गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून औषध फवारणी करण्यात आली.
उमदी ता. जत येथील ग्रामपंचायत सभागृहात कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. उमदी शेजारी च असणाऱ्या सोलापूर व विजापूर या ठिकाणी कोरोना पाँजीटिव व्यक्ती सापडल्याने उमदी व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. उमदी व परिसरातील अनेक लोकांचे व्यवहार विजापूर व सोलापूर येथे आहेत. तसेच कर्नाटकात विजापूर व शेजारी असणाऱ्या खेड्यापाड्यात अनेक नातलग असल्याने तेथील नागरिकांशी अनेक वेळा संबध येतो. त्यामुळे आपल्या परिसरात कोरोणा पासून बचाव करण्यासाठी पुर्वतयारी म्हणून लोकांनी च सलग पाच दिवस स्वतःला लाँकडावुन करण्याचा निर्णय घेतला.
दिनांक १६ ते २० एप्रिल पर्यंत सपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवण्यात येत आहे. या बैठकीत सरपंच वर्षा निवृत्ती शिंदे, सपोनि दत्तात्रय कोळेकर, उपसंरपंच रमेश हळके, तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment