Wednesday, April 1, 2020

जत तालुक्यात 21 जण होमक्वारंटाईनमध्ये

7 हजार 500 जणांची केली आरोग्य तपासणी
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात 21 प्रवासी नागरिक परदेशातून आले आहेत. त्यांना होमक्वारंटाईनमध्ये मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची दैनंदिन आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय बाहेर  गावावरून आलेल्या सुमारे 7 हजार 500 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्यामध्ये कोणतेही दोष आढळून आले नाहीत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी संजय बंडगर यांनी दिली.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  राज्य व केंद्र स्तरावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले असून राज्य,जिल्हा सीमा सील करण्यात आल्या आहेत. संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. जत
तालुक्यातील प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सर्वच दृष्टीने सज्ज झाले आहे. जत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यावर नव्याने नियुक्त करण्यात आलेले कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांना स्वतंत्र वाहन व त्यांच्या सोबतीला आरोग्य कर्मचारी देऊन घरोघरी फिरून ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. जत तालुक्यात आतापर्यंत कोरोना संसर्ग व प्रादु्भाव झालेला एकही संशयित रुग्ण सापडलेला नाही. आशा वर्कर्स घरोघरी जाऊन परदेशातून किंवा बाहेर गावाहून कोणी आले आहे का, याची चौकशी करत आहेत. तसेच कोणी आजारी असल्यास रुग्णालयात जाण्यास सांगितले जात आहे.

No comments:

Post a Comment