Wednesday, April 22, 2020

आज दिवसभरात 531 कोरोना बाधित रुग्णांची वाढ

18 जणांचा मृत्यू; 65 रुग्ण बरे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. आज दिवसभरात 531 रुग्णांची वाढ झाली आहे.  त्यामुळे आतापर्यंत राज्यात 5 हजार 649 रुग्ण संख्या झाली आहे.  तर देशात हा आकडा 20 हजार 471 झाली आहे. देशभरात कोरोनाचा आणखी  धोका वाढला आहे.
दरम्यान, आज दिवसभरात राज्यात  18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 65 रुग्ण बरे झाले आहेत.  देशभरात आतापर्यंत 652 कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.  राज्यात आतापर्यंत 789 रुग्ण बरे झाले आहेत. मालेगावात आतापर्यंत96 रुग्ण आढळून आले आहेत. औरंगाबादची संख्या 38 झाली आहे. मुंबईत 3हजार 683 रुग्ण संख्या झाली आहे.  मुंबईत आतापर्यंत161 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत कोरोनाचे 19 रुग्ण आज आढळून आले आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षा दलातील एकाला कोरोना झाला आहे.  जगभरात 25 लाख 57 हजार रुग्ण आढळून आले आहेत तर  7 लाख रुग्ण बरे झाले आहेत.

No comments:

Post a Comment