Tuesday, April 14, 2020

जत तालुक्यात 8 निवारा केंद्रात 310 लोकांची सोय

फाइल चित्र
सांगली,(प्रतिनिधी)-
रोजंदारीवरील मजूर , निराधार व्यक्ती , ऊस तोड मजूर , भटके लोक तसेच कायमस्वरूपी ज्यांना राहण्यासह खाण्यापिण्याची सोय उपलब्ध नाही अशांसाठी  सांगली जिल्ह्यात निवारा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात अशी 94 केंद्रे आहेत. जत तालुक्यात 8 केंद्रे असून 310 लोकांची याठिकाणी राहण्या-खाण्याची सोय करण्यात आली आहे.

पर राज्यातील किंवा अन्य जिल्ह्यातील लोक  सध्या ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्यांना आसरा देण्यासाठी निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत . यात जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 94 केंद्रांतून सद्य : स्थितीत 36 हजार 135 लोकांची सोय करण्यात आली आहे . महानगरपालिका अंतर्गत दोन ठिकाणी कम्युनिटी किचन स्थापन करण्यात आले आहे . त्या अंतर्गत 892 लोकांना जेवण देण्यात येत आहे .
मिरज तालुक्यात 8 निवारा केंद्रात 1 हजार 921 , तासगाव तालुक्यात एका निवारा केंद्रात 155 कवठेमहांकाळ तालुक्यात 2 निवारा केंद्रामध्ये 470 , जत तालुक्यात 8 निवारा केंद्रामध्ये 310 , खानापूर तालुक्यात 18 निवारा केंद्रात 2 हजार 576 , आटपाडी तालुक्यात 6 निवारा केंद्रात 788 , पलूस तालुक्यात 8 निवारा केंद्रात 7 हजार 648 , कडेगाव तालुक्यात 18 निवारा केंद्रात 10 हजार 226 , वाळवा तालुक्यात 18 केंद्रात 10 हजार 964 , शिराळा तालुक्यात 2 केंद्रामध्ये 185 तर सांगली - मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 5 निवारा केंद्रामध्ये 892 व्यक्ती आहेत . अशा 94 निवारा केंद्रातून 36 हजार 135 जणांची सोय करण्यात आली . . . साखर कारखाना कॅम्पसमधील 31 हजार 81 ऊसतोड कामगारांचा त्यात समावेश आहे . 85 एनजीओंची निवारा केंद्रात खाद्यपदार्थ वितरणासाठी मदत होत आहे . निवारा केंद्रामध्ये आसरा देण्यात आलेल्यांमध्ये हटिल कामगार , रोजंदारीवरील मजूर , निराधार व्यक्ती , ऊस तोड मजूर , भटके लोक आहेत .
सर्वांना जेवण , औषधे त्याचबरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत . वैद्यकीय पथकामार्फत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे . निवारा केंद्रात भरती करताना त्यांना ताप , खोकला , सर्दी अशी काही लक्षणे आहेत का ? याची तपासणी करण्यात आली . त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे .

No comments:

Post a Comment