Wednesday, April 1, 2020

तुकाराम बाबा यांच्याकडून अन्नधान्याचे किट वाटप

जत,(प्रतिनिधी)-
गोंधळेवाडी (ता जत) येथील श्रीसंत बागडे बाबा मठाचे मठाधिपती ह.भ.प तुकाराम महाराज यांनी मठाचे भक्त लोक, कामगार व गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे किट वाटप केले. या किटमध्ये गव्हाचा आटा, पोहे, शेंगतेल, साबण, जिरे, साखर,चहा पावडर,मीठ, मोहरी, तूर डाळ, तांदूळ अश्या ११ जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

     कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने गोरगरीब आणि कामगार यांच्यासाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व कामे बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरातील लागणारे अन्नधान्य सुद्धा समाप्त झाले आहे. माणुसकी दाखवत तुकाराम बाबा यांनी अन्न धान्य वाटप केले आहे. यावेळी लोकांच्या गैरसोयीचा विचार करुन २ हजार एकशे एक जीवनावश्यक वस्तुंचे कीट बागडे बाबांचे भक्तगण व गरीब लोकांना ह.भ. प तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
    तुकाराम महाराज हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. अनेक वेळा लोकांच्या मदतीला धाऊन जातात. दुष्काळ,महापूर यासारखी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जनतेच्या मदतीला धावून गेले आहेत. दुष्काळातही पिण्याच्या पाण्याचे व टाक्यांचे वाटप  केले आहे.  महापुराच्या वेळी कपडेलता, इतर साहित्याचे वाटप केले आहे. गेल्या वर्षी जत तालुक्यात भयानक अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी स्वतः स्वखर्चाने मोफत चारा छावणी सुरु केली होती.
    जत तालुका कायमस्वरुपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात ऊसतोडणी कामगार,वीटभट्टी कामगारांची संख्या जास्त आहे.राष्ट्रीय आपत्तीच्या दानशूर व्यक्तीनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन ह.भ.प तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे. संख येथील मरीआई चे कुंटुबाचे शांताबाई कोळी, बाहेरून आलेले सोमाण्णा व्हनमराठे, टेलिफोन कामगार यांना कीट वाटप केले. तसेच अंकलगी येथे १५ कुटंबांना कीट वाटप केले.असे दोन हजार एकशे एक लोकांना अन्न धान्य किट वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment