Monday, April 6, 2020

करोनाबाबत जत पोलिसांच्या आवाहनास माजी सैनिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जत,(प्रतिनिधी)-
करोना(केविड-19) व्हायरस राज्यातून आणि देशातून हद्दपार करण्यासाठी  जतेमध्ये जास्ती जास्त जनजागृती करण्यासाठी काल पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जत पोलिस ग्रांउडवर माजी सैनिकाची बैठक पार पडली. पोलिस निरीक्षक श्री.शेळके यांनी तालुक्यातील माजी सैनिकाना आवाहन केले होते त्यानुसार तालुक्यातील  150 माजी सैनिक हजर होते.

करोना (केविड-19) व्हायरसच्या पार्श्वभूमीवर त्याला कसा प्रतिबंध घालायचा याबाबत श्री. शेळके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. गावातील जनतेस प्रबोधन करावे, असे सांगितले. त्या नुसार वय वर्ष 50 पेक्षा कमी असणाऱ्या माजी सैनिकाना विशेष पोलीस अधिकारी पदाचे ओळखपत्र देणार असल्याचे तसेच 50 वर्षे अधिक वय असलेल्या  माजी सैनिकाना पोलीस मित्र पदाचे ओळखपत्र देणार असल्याचे सांगितले. माजी सैनिकानी  त्यांच्या आवाहनास उत्सफुर्त प्रतिसाद दिला.
 पोलिस निरीक्षक श्री. शेळके यांनी माजी सैनिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आंनद व्यक्त केला. आपण सर्वानी मिळून एकत्रितपणे काम करून करोना व्हायरसपासून आपल्या जनतेला 100 टक्के वाचवू शकतो असे ते शेवटी म्हणाले.
   बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. इतिहासात पहिल्यांदाच जत शहरात सर्व दलाचे माजी सैनिक एकत्र येऊन चांगला प्रतिसाद दिला असे मत माजी सैनिक दत्तात्रय शिंदे यांनी व्यक्त केले.  जत तालुका भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी सर्वाचे अभार मानले.

No comments:

Post a Comment