Friday, April 10, 2020

जत लायन्स क्लबच्यावतीने मास्कचे वाटप

जत,(प्रतिनिधी)-
देशामध्ये कोराना व्हायरसने बाधित झालेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. आता राज्य सरकारने मास्कची सक्ती केली आहे. मास्क न घातल्यास शिक्षा दिली जाणार आहे. त्याचबरोबर देशावर आलेल्या या संकटाचा सामना पोलिस,आरोग्य व सफाई कामगार, वृत्तपत्राचे बातमीदार, आशा वर्कर हे जिवाची बाजी लावून काम करीत आहेत.
यामध्ये आपणही मदत करावी या उद्देशाने जत लायन्स क्लबच्यावतीने गावातील गरजु व्यक्तींना मास्कचे वाटप करण्यात आले. लायन्स क्लबचे रिजन चेअरमन राजेंद्र आरळी यांच्याहस्ते आशा व गटपर्वतकांना मास्कचे वाटप करण्यात आले.
काही बचत गटातील महिला शेतातील उत्पादित भाजीपाला गावामध्ये घरोघरी जावून विकताना दिसत आहेत. अशा गरजू महिलांना देखील मास्क्चे वाटप करण्यात आले. यापूर्वी लायन्स क्लबने जत पोलिस कर्मचाऱ्यांना पांढरे रुमाल वाटप केले होते. आता शहरात मास्कची उपलब्धता झाल्याने लायन्स क्लबने मास्क वाटप सुरू केले आहे. आरळी यांच्याबरोबर लायन्सचे अध्यक्ष दिनकर पतंगे हे सुध्दा मास्कचे वाटप करीत आहेत.

No comments:

Post a Comment