Sunday, April 12, 2020

सनमडीत शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

उमदी,(वार्ताहर)-
जत तालुक्यातील सनमडी येथील शिक्षक तथा
मुख्याध्यापकाने गावातीलच एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. सतीश अंकुश कांबळे (वय 45, रा. सनमडी, ता. जत) असे संशयित आरोपी शिक्षकाचे नाव असून शनिवारी दुपारच्या वेळस ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आरोपी कांबळे हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या घरच्यांनी फिर्याद दिली आहे.

अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी सतीश कांबळे हा जत शहर हद्दीतील पहिली ते चौथीच्या एका खाजगी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या संचारबंदी बंदी लागू असल्याने सर्वच शाळांना सुट्या आहेत. या दरम्यान गुरूवारी दि.9 एप्रिल रोजी अल्पवयीन मुलीला दमदाटी करून आपल्या स्वतःच्या घरात घेऊन गेला व त्याने तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर शनिवारी दुपारी संचारबंदी असल्याने गावात कमालीची शांतता होती. त्यामुळे संशयित आरोपी कांबळे यांने याचा फायदा घेत पिडीत मुलीस पून्हा दमदाटी केली व सनमडी गावातील जिल्हा परिषद शाळेत घेऊन गेला. तिथे तिच्यावर बळजबरी करत असताना मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. जवळच मुलीचे घर असल्याने घरात बसलेला मुलीचा भाऊ घराबाहेर धावत आला.
तेवढ्यात संशयित आरोपी कांबळे हा भाऊ व
परिसरातील नागरिक गोळा होऊ लागल्याने तेथून पसार झाला. या घटनेनंतर पिडीत मुलीसह नातेवाईकांनी उमदी पोलिस ठाणे गाठत संबंधितआरोपी सतीश कांबळे यांच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. तसेच बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संशयित आरोपी शिक्षक सतीश कांबळे याच्या शोधासाठी पोलिसांनी त्याच्या संपर्कातील शिक्षक, शिक्षण विभागाचे कर्मचारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडे ही
चौकशीची सूत्रे हलवली आहेत. परंतु, तो अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment