Tuesday, April 14, 2020

उमदी परिसरात अवकाळी पावसाने मोठे नुकसान

पंचनामा करण्याची मागणी
( निगडी बुद्रुक येथील पुंडलिक कोळगीरी यांची बाग जमीनदोस्त झाली आहे.)
उमदी,(वार्ताहर )-
विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने सोमवारी सायंकाळी उमदी परिसरात थैमान घातले. गारांसह पाऊस झाल्याने याचा फटका द्राक्षे, शेडवरील बेदाणा, डाळिंब व इतर काढणी केलेल्या पिकांना बसला आहे. वादळी वाऱ्याने दादू बंडा सातपुते यांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. अवेळी होत असलेल्या या पावसाने शेतकरी हैराण झाला आहे.

उमदी येथील अमगोंडा माशाळ यांच्या बेदाणा शेडमध्ये पावसाचे पाणी गेल्याने साधारण सहा लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच सुरेश पवार यांच्या बेदाणा शेडचे नुकसान झाले आहे. तसेच भिमू माशाळ यांच्याही बेदाणा शेडमध्ये वाळत घातलेल्या बेदाणा भिजून मोठे नुकसान झाले आहे. तसेच डाळिंब बागांनाही याचा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला आहे. त्यामुळे शेतकरी बेजार झालेला आहे.
 ( औदुता कोळी यांच्या बेदाणा शेडमध्ये पाणी जाऊन बेदाणा भिजून गेला.)
गेल्या काही दिवसापासून या परीसरात ढगाळ वातावरण विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. यापूर्वीही तीन वेळा अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. मोठय़ा प्रमाणावर नुकसान होऊनही शासनाने पंचनामे केले नाहीत. त्यामुळे काल झालेल्या पावसामुळे उमदी परिसरातील मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी  दिवसभर ढगाळ वातावरण सांयकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने उमदी परिसरातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.  बेदाणा शेडमध्ये आसलेला  बेदाणा भिजून मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तयार होत असलेला बेदाणा निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. आचानक आलेल्या पावसामुळे बेदाणा शेडसह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या द्राक्ष बेदाणा निर्मितीची प्रक्रिया करीत आहेत. बेदाणा शेडमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. गुणवत्ता असलेला बेदाणा तयार होणार नाही व तयार बेदाणेला चांगला दरही मिळणार नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
बाबू वागदरी यांच्या बेदाणा शेडमध्ये पाणी गेल्याने पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. विठ्ठल शेवाळे, भिमणा जालगेरी, मदू पुजारी यांच्या  शेडवरील बेदाणा भिजून मोठे दहा लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. विठ्ठल चव्हाण यांच्या शेडवरील कागद उडून गेल्याने त्यांच्याही बेदाण्याचे नुकसान झाले आहे.
(दादू बंडा सातपुते यांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे.)

No comments:

Post a Comment