Monday, April 20, 2020

सोलापूर डेंजर झोनमध्ये : कोरोना बाधितांची संख्या २१

शहरात आणखी ६ पॉझिटिव्ह रुग्ण
सोलापूर ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सोलापूरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. आता ही संख्या २१ झाली आहे. आज सोमवारी मिळालेले ६ रूग्णापैकी बापूजीनगर,अयोध्या नगरी येथील प्रत्येकी १ तर कुर्बानहुसेन नगर आणि पाच्छा पेठ येथील प्रत्येकी २ रूग्ण आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली. हे सर्व भाग पोलीसांनी बंदिस्त केले आहेत. या भागात पोलीसांची गस्त वाढविली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे बजावण्यात आले आहे.

सोलापूरात आत्तापर्यंत कोरोना संशयित असलेल्या ७७८ जणांची स्वॅब चाचणी केली. यात ५६९ जणांचे अहवाल आत्तापर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यातील ५४८ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे तर २१ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली. सोलापूरात रविवारपर्यंत १५ रूग्ण मिळाले होते. आज एकदम सहाने संख्या वाढली. यात चार पुरूष दोन महिलांचा समावेश आहे. एकूण २१ पैकी २ रूग्णांचा मृत्य यापूर्वीच झाला आहे तर १९ जणांवर सोलापूर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अद्यापही २०९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झालेला नाही. सांगली नंतर आता शेजारचा सोलापूर जिल्हा देखील डेंजर झोनमध्ये पोहचला.

No comments:

Post a Comment