Wednesday, April 15, 2020

उमराणी येथील धानम्मा देवीची यात्रा अखेर रद्द

जत, (प्रतिनिधी)-
लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत संपेल असे गृहीत धरून उमराणी (ता.जत) येथील जागृत देवस्थान श्री धानम्मादेवीची यात्रा सालाबादप्रमाणे  16 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन पुन्हा 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याने अखेर ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसे यात्रा कमिटीने एका निवेदनाद्वारे कळविले आहे.

 कोरोना महामारीमुळे राज्यात जमावबंदी कलम 144 लागु असल्यामुळे सदरची यात्रा रद्द करण्यात आली आहे. दिनांक 16 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या यात्रेसाठी धानम्मादेवीच्या दर्शनासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र राज्यातील भाविक हजेरी लावीत असतात. परंतु कोरोना विषाणुजन्य प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या पाश्वभुमीवर शासकीय आदेश व सुचनाचे पालन करत यात्रा कमिटीने सालाबादप्रमाणे होणारी यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री धानम्मादेवी उत्सवादरम्यान अभिषेक, दंडवत, पालखी उत्सव ,करमणुकीचे कार्यक्रम, प्रवचन, भव्य रथोत्सव कार्यक्रम होणार नाहीत व भाविकानी मंदिर परिसरात फिरु नये व गर्दी करु नये अशी विनंती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष  आप्पासाहेब नामद यांच्याकडून करण्यात आले आहे. यावेळी कमिटीचे पदाधिकारी  सोमनिंग बिरादार, गिरमल्ला बगली,काशिनाथ नामद,महादेव राचगोंड,चिदानंद मठपती,आप्पासाहेब बिरादार, सदाशिव तेली, मल्लिकार्जुन बिरादार सदाशिव माळी लक्ष्मण राचगोंड  श्रीशैल पाटील ,इरगोंडा पाटील, सिदगोंडा उन्होळी,श्रीशैल कवटगी, मनोहर अजंनी,मुरग्याप्पा ढेंगी तसेच उमराणी गावातील सर्व तरुण मंडळ पदाधिकारी, उमराणी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment