Friday, April 17, 2020

गारपीट नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा

बसवराज पाटील यांची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील पश्चिम व दक्षिण भागात आज अवकाळी पावसाने आणि गारपिटाने शेती आणि बागांचे मोठे नुकसान झाले आहे.  या अवकाळी पाऊस आणि गारपीटाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्याची मागणी सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे.
बसवराज पाटील यांनी तहसिलदार सचिन पाटील यांना आज या भागात झालेल्या गारपीटीची ताबडतोब माहिती देऊन त्यांच्याशी चर्चा केली व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
शेतकरी बांधवांनी या संकटकालीन परिस्थितीत विचलित होऊ नये. शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे, असे आवाहन तहसिलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
तहसिलदार यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ नुकसानग्रस्त भागात भेट देऊन
पाहणी करण्याचे निर्देश द्यावेत आणि स्वतः तहसिलदार यांनीही ताबडतोब जत तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची परिस्थिती जाणून घेण्याची मागणी सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे.  बिळूर, एकुंडी, जिरग्याळ , साळमळगेवाडी, वज्रवाड या परिसरातील फळबागा, द्राक्ष, डाळींब आणि आंब्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment