Sunday, April 19, 2020

ठिबकसिंचन व पाईपलाईन साहित्याची दुकाने सुरू;शेतकाऱ्याना दिलासा

( जत तालुक्यातील संख येथे सोशल डिस्टन्सिंग पाळत शेतकऱयांनी अशाप्रकारे शेतीविषयक साहित्याची खरेदी करत आहे.)
सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात शेतीसाठी लागणारे सर्व अवजारे,यंत्राची सुट्टे भाग व ठिबक आणि पाईपलाईनच्या साहित्य विक्रीवर बंदी घालण्याचे आले होते. या साहित्या अभावी शेतकऱयांची कामे खोळंबली होती.दुसऱ्या टप्प्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये  ही बंदी उठवण्यात आल्याने शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे. संख आणि परिसरात ठिबक आणि पाईपलाईन साहित्याची दुकाने चालू झाली आहेत. ठिबक साहित्य खरेदीसाठी शेतकऱयांची गर्दी वाढू लागली आहे.

केंद्र शासनाने लॉकडाऊन कालावधीत शेती अनुषंगिक कामे सुरळीत पार पाडता  यावे यासाठी त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा प्रतिबंधामधून वगळण्यात आले आहे. शासनाने जारी केलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार लॉकडाऊनच्या कालावधीत कृषी विषयक कामांना ग्रामीण भागात सूट देण्यात आलेली आहे. शेती अनुषंगीक शेतकरी व शेतमजुरांची शेतीविषयक कामे, शेती/ कृषी उत्पादनाची खरेदी विषयक कामे, मंडी/बाजार समित्यांची कृषी विषयक कामे, पीक पेरणी संबंधाने यंत्राच्या हालचाली, कृषी यंत्राच्या दुरुस्तीसाठी आवश्यक कामे, दुकाने इत्यादी कामे सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने प्रतिबंधीत यादीतून वगळण्याचे आदेशीत केले आहे.त्यामुळे या साहित्यावाचून शेतीची कामे खोळंबलेल्या शेतकऱयांना दिलासा मिळाला असून शेतीविषयक वस्तू खरेदी करण्यासाठी अशा दुकानांत गर्दी होताना दिसत आहे.संख येथील बागडेबाबा ड्रीप एजन्सी यांना जत तालुका कृषी अधिकारी हणमंतराव मेडीदार यांनी लॉकडाऊन मधून या सेवेसाठी शिथिलता दिल्यानंतर दुकान उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. या एजन्सीचे मालक आणि जैन ठिबकचे अधिकृत वितरक बसवराज कुंभार  यांनी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱयांना शिस्त लावली आहे.

No comments:

Post a Comment