Sunday, April 19, 2020

वॉर्डनुसार कोरोना आरोग्य तपासणी करा

आबासाहेब ऐवळे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
राज्यात आणि देशात महिनाभर लॉक डाऊन करूनही कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व स्तरावर ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील  प्रत्येक वॉर्डनुसार कोरोना आरोग्य तपासणी मोफत करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे (ऐवळे गट)   संस्थापक अध्यक्ष आबासाहेब ऐवळे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, या कोरोना आरोग्य तपासणीच्यानिमित्ताने सर्व माणसांची तपासणी होऊ शकेल. गाव पातळीवर प्रत्येक वाडांतील मतदार व त्यांचे कुटुंबाची संपूर्ण तपासणी शासनामार्फत व्हावी,त्यामुळे कोरोना आजाराची प्रत्यक्ष संपूर्ण माहिती शासनास उपलब्ध होईल . व जनमाणसासदेखील या महारोगाची माहिती ताबडतोब मिळेल. अनेक लोक या आजारास घाबरून या आजाराची माहिती लपवित आहेत . त्यामुळे अचानक रुग्ण पुढे येत आहेत. याचा ताण प्रशासन आणि पोलिसांवर येत आहे. सरकारने प्रत्येक गाव,शहर, मतदार यादयाप्रमाणे वाडातील सर्वांची मोफत तपासणी व्हावी, अशी मागणी संघटनेद्वारे आम्ही करीत आहे . त्याचा शासनाने यावर निर्णय घेऊन व स्वतः लक्ष घालून सर्व सामान्य जनतेस न्याय दयावा,अशी मागणी केली आहे.याआरोग्य तापासणीसाठी सामाजिक सेवा संस्थानची मदत घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment