Friday, April 24, 2020

स्वरा संग्रामे हिचे मंथन परीक्षेत यश

तासगाव,(जत न्यूज वृत्तसेवा)-
मंथन प्रज्ञाशोध परीक्षा २०२० ची राज्य गुणवत्ता यादी मंथनच्या वेबसाईटवर नुकतीच  प्रसिद्ध झाली आहे. ही परीक्षा राज्यातील विविध केंद्रावरुन घेण्यात आली होती. सावळज शाळा नं.२ ने या वर्षी सुध्दा गुणवत्तेची परंपरा कायम ठेवलेली आहे तासगाव तालुक्यातील सावळज शाळा नं.२ जिल्हा परिषद शाळेची इयत्ता दुसरीत शिकणारी कु. स्वरा सुधाकर संग्रामे हिने १५० पैकी १४० गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ६ वे स्थान पटकावले आहे.

तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने तिच्या यशाचे श्रेय वर्गशिक्षिका वासंती पाटील , सौ हसबे,आई ललिता, वडील सुधाकर संग्रामे व याआधी शिकविणाऱ्या शिक्षकांना दिले आहे. मुख्याध्यापिका बबुताई भोसले, केंद्रप्रमुख पांडुरंग शिंदे, प्रकाश कांबळे,  शिक्षण विस्तार अधिकारी यांनी  या मुलीचे अभिनंदन केले. विविध अधिकारी वर्गाकडून शिक्षकांकडून, मित्रमैत्रीणी कडून व सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment