Saturday, April 25, 2020

जत फ्रेंडस सर्कलच्यावतीने अन्नधान्य व भाजीपाला वाटप

जत,( जत न्यूज वृत्तसेवा)-
जत येथील जत फ्रेंडस सर्कलच्यावतीने अध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जत येथील प्रभाग आठमध्ये गरजू व गोरगरीब जनतेला अन्नधान्य व भाजीपाला वाटप करण्यात आला. कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये गरीब व हातावर काम करून पोट भरणाऱ्या लोकांची उपासमार होऊ नये, म्हणून मंडळाने हा निर्णय घेतला.

कोरोना व्हायरसमुळे राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे गोरगरीब व गरजू लोकांना मदत करावी म्हणून जत शहरातील साळेवस्ती,दुधाळवस्ती, रामरावनगर, छत्रीबाग, विद्यानगर, विद्युत कॉलनी या परिसरातील गोरगरीब व हातावर काम करणाऱ्या मजूरांना अन्नधान्य व भाजीपाला घरोघरी जाऊन मोफत देण्यात आला. जत शहरात १०० टक्के लॉकडाऊन असल्यामुळे शहरवासीयांना घराबाहेर पडता येत नसल्याने जीवनावश्यक अन्नधान्य व भाजीपाला मोफत देण्यात आला.
 यावेळी सोनवणे म्हणाले की, सध्या देशावर व राज्यावर कोरोना या आजारामुळे २१ दिवसाचे लॉकडाऊन झालेले आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. या कालावधीत गरीब व गरज लोकांच्या गरजा पूर्ण करणे हे माणुसकी म्हणून प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्यआहे. या कुटुंबाना आमच्याकडून अन्नधान्याचे किट दिलेले आहे. यापुढे लहान मुले व रुग्णांना दवाखान्याचा खर्च पेलावत नसलेल्या रुग्णांचा रुग्णालयाचा खर्च  स्व:निधीतून मदत करणार असल्याचे सांगून गरजुंनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.यावेळी सुखदेव ऐवळे, सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार, संजय साळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment