Wednesday, April 8, 2020

ग्रामीण भागातील जनतेला कळेना कोरोनाचे गांभीर्य

जत,(प्रतिनिधी)-
राज्यात महामारी कोरोनाने थैमान घातले असून
आता  23 पैकी 12 जणांचे क्वार्ण्टाइण संपले आहे. अद्याप 11 जणांचे क्वारण्टाइन संपणार आहे तरीही कोरोनाची भीती असताना सर्वत्र संचारबंदी असताना शहरामध्ये या आदेशाचे पालन निट होत नाही मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात जनतेला या महामारी कोरोनाचे गांभीर्य कळेना असे चित्र दिसत आहे.
तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये मात्र प्रशासनाला  यावर नियंत्रण मिळवता आले नाही. खेड्यापाड्यात पारावार तसेच चावडीवर घोळक्याचे घोळके करून कोरोनावर गप्पाचे फड रंगत असून गावात नागरिक मुक्त संचार करून फिरत आहे.
या प्रकाराच्या विरोधात  जनतेला कळेना कडक कारवाई होण्याची गरज निर्माण झाली आहे नाही तर ग्रामीण भागात हा साथीचा रोग पसरून प्रशासनाची मोठी  दमछाक होऊ शकते लॉकडाऊन करून संचारबंदी शासनाने केली आहे केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी नागरिकांना रस्त्यावर येण्याची परवानगी देण्यात आली परंतु ग्रामीण भागात  विनाकारण नागरिक फिरत आहे संचारबंदीत शहरातील नागरिक किमान घरात बसून असल्याने संपर्क टाळता येत आहे याउलट चित्र ग्रामीण भागातील कोरोनाचे अनेक गावात बघवयास मिळत आहे. शहरातील विविध भागासह रस्त्यावर पोलिसांची वाहने गस्त घालत असल्याने सहसा कोणी घराबाहेर पडताना दिसत नाही. तर ग्रामीण भागात चित्र थोडेसे उलट आहे ग्रामीण भागात घरे छोटी व जवळजवळ असतात सहाजिकच एकमेकांचे उठणे बसणे असते. ग्रामस्थ नेहमीप्रमाणे सकाळ-संध्याकाळ गावात पारावर चावडीवर घोळक्याने बसतात, तर सध्या शाळेला सुट्टी असल्याने लहान मुले सर्वच गावभर फिरत आहेत. क्रिकेट खेळत आहे. महानगरातून आलेले अनेक नागरिक हेसुद्धा गावात फिरत असल्याने त्यांच्या या बेफीकीर व बेजबाबदार वागणुकीमुळे ग्रामीण भागात जनतेलाकोरोनाचे गांभीर्य कळत नसल्याने ग्रामीण भागातील गावांना याचा मोठा फटका बसू शकतो.

No comments:

Post a Comment