Wednesday, April 8, 2020

मेंढीगिरीत गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यांतील मेंढेगिरी ग्रामपंचायतच्यावतीने येथील गरिब व गरजू कुटूंबाना धान्य वाटप करण्यात आले.कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर खबरदारी म्हणून विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात देखील विविध उपाय योजनां ग्रामिण प्रशासनाकडून राबविले जात आहेत. स्वच्छता, फवारणी करण्यात येत आहे.

देशात  या कोरोनामुळे देश लाँकडाऊन झाला असल्यामुळे अनेक लोकांच्या हाताना काम नाही कामेही बंद आहे. म्हणून असल्या काही गरीब व गरजू लोकांना हातभार म्हणून मेंढेगिरीचे सरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच सुभाष बिरादार, माजी उपसरपंच श्रीदेवी कदीमणी, ग्रामसेवक के एस ऐवळे, पत्रकार राजू ऐवळे, रोजगार सेवक चिदानंद ऐवळे यांच्या विषेश सहकार्याने दानशूर लोकांनकडून पाच किलो आटा, पाच किलो तांदुळ, एक किलो तेल, एक किलो बेसन, एक किलो डाळ, एक किलो साखर, चहा पावडर, साबन, असे संसारउपयोगी वस्तूची वाटप करण्यात आले.
यावेळी विशेषकरुन धान्य वाटप करताना
शासनाच्या आदेशाचे पालन करून सोशल डिस्टिंगशेन पाळून धान्य वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment