Saturday, April 25, 2020

जतमध्ये 'जनता कर्फ्यू' चे उल्लंघन; तिघांवर गुन्हा

जत,(प्रतिनिधी)-
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या संचार बंदी आहे.त्यातच गेले चार दिवस नगरपालिकेच्यावतीने 'जनता कर्फ्यू' लावताना संचार बंदीची कडक अंमलबजावणी केली जात असताना जतमधील काही दुकानदारांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. याबाबतीत तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत शहरात 'जनता कर्फ्युची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने आणि व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. याला नागरिक आणि दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र काही क्वचित लोकांचे असहकार्य ही पाहायला मिळाले. संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी बॉम्बे कन्फन सरीचे मालक सागर बलराम मूलचंदानी, जमखंडी(कर्नाटक)  येथील चिंनाप्पा  गौरन्नवार, सिडगोंडा गौरन्नवार या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जतचे दुकानदार मूलचंदानी यांनी जमखंडी येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य देतो, तुम्ही जतला या असा निरोप दिला होता. शनिवारी सकाळी जमखंडीहून सीमाबंदीचे उल्लंघन करून दोघे शेतकरी जत येथील उमराणी रोडवर येऊन थांबले होते.  दरम्यान, या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणारे कॉन्स्टेबल, नगर परिषदेचे कर्मचारी यांनी त्यांना 'तुम्ही इथे काय करताय?' अशी विचारणा केली. यावेळी गौरन्नवार यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेवढ्यात व्यापारी मूलचंदानी याठिकाणी माल घेऊन आला.  मूलचंदानीयांच्या कारची तपासणी करण्यात आली. त्यात शेतीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. या प्रकरणी कार (एमएच 10 सीएक्स 1229) ,दुचाकी (केए-48 क्यू 4466) व (केए- 28 एच 2865) ही वाहने जत पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

No comments:

Post a Comment