Friday, April 3, 2020

जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात मिळाव्यात : प्रकाश जमदाडे

जत,(प्रतिनिधी):
ग्रामीण भागामध्ये जिवणावश्यक वस्तु पुरेशा व योग्य दरात पुरवठा करण्यासाठी तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची मदत घ्यावी, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती व केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य प्रकाश जमदाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

कोरोना विषाणू महामारी प्रतिबंध करणेसाठी आपण स्वतः व आपले संपूर्ण प्रशासन रात्र दिवस काम करीत आहे. आपणास मनपूर्वक धन्यवाद ! आपला जीव धोक्यात घालून रात्र दिवस काम करणारे डॉक्टर, नर्सेस, पोलिस व अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या कार्याला सलाम ! संचारबंदी लागू होऊन जवळपास १० दिवस झाले आहेत काही गावातून फोन येताहेत की किराणा माल दुकानदार ज्यादा दराने विकू लागला आहे, दर ज्यादा घेत आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये दररोजच्या गरजेच्या असणाऱ्या वस्तू म्हणजे साखर, चहा पावडर, तांदूळ, गव्हाचा आटा, साबण, निरमा, गोडेतेल व वेगवेगळया डाळी इत्यादी मालाचे दर वाढवून जवळपास दीडपट ते दुप्पट दराने नागरीकांना विकत आहेत. यांची चौकशी केली असता जत सारख्या शहरामध्येच होलसेल दुकानात या जिवनाआवश्यक वस्तूचा म्हणावा तेवढा साठा नाही वरून म्हणजे जिल्हयातून आठ दिवसापासून मालच आलेला नाही असे,
दुकानदारांकडून सांगितले जात आहे. तसेच जत तालुक्याचा काही भाग माडग्याळ, उमदी, संख, बिळूर,दरीबडची या परीसरातील छोटे दुकानदार हे कर्नाटक राज्यातील विजापूर, चडचण व अथणी येथून बऱ्याच प्रमाणात किराणा वस्तू आणतात परंतू कर्नाटक सिमा बंद असलेणे जत शहरातील होलसेल दुकानदारावर मोठया प्रमाणात ताण आलेला आहे. त्यामुळे दररोजच्या जिवनावश्यक वस्तू आवश्यक तेवढया प्रमाणात मिळणेस अडचण येत आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की, होलसेल दुकानदारांना आवश्यक तितका माल आणून ठेवून छोटया दुकानदारांना आवश्यक तेवढा योग्य दरामध्ये पुरवण्यात यावा तसेच तहसिल कार्यालया कडील पुरवठा विभागात दररोजच्या व्यावहारात लागणाऱ्या वस्तूचे दरपत्रक लावावेत त्याची प्रसिद्ध करावी तसेच प्रत्येक गावात ठराविक वेळेत दुकान उघडे ठेवून आवश्यक वस्तू देणेची सूचना द्यावी म्हणजे नागरीकांची अडचण होणार नाही. तसेच शेतीसाठी आवश्यक असणारी बियाणे, औषधे, खते मिळण्यासाठी कृषी दुकाने ठरावीक वेळेत चालू ठेवून आवश्यक वस्तू देणे विषयी सुचना द्याव्यात. तसेच शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल देणेसाठी ग्रामसेवक, तलाठी व संपर्क अधिकारी यांचे सहीने परवानगी देणेत यावी. संचारबंदीमुळे गंभीर आजारी रूग्णाना सांगली मिरजेला दवाखान्याला जाणेसाठी प्राथमिक आरोग्य केद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पत्र घेऊन जाणेसाठी परवानगी द्यावी जिवणावश्यक वस्तू पुरवणारे, मेडीकल स्टोअर्स व खाजगी डॉक्टर इत्यादी व्यावसायकांना मास्क व सेंनीटायझर जिल्हा परीषद, नगरपरीषद किंवा ग्रामपंचायत मार्फत पुरीवणेत यावेत.
तालुका प्रशासन, पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग यांचे मदतीला निवडणुकीत जसे इतर विभागाकडील अधिकारी व कर्मचारी घेतात तसे कर्मचारी घेवून शेतकन्याचा शेतीमाल वाहतूक व विक्री, दुधपुरवठा, खाजगी डॉक्टरामार्फत वैदयकीय सेवा, किराणा बाजार व भाजीपाला यासाठी पंचायत समिती गण निहाय प्रमुख अधिकारी नेमून प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक इतर विभागाकडील कांही कर्मचारी यांची समिती करून अत्यावश्यक वस्तूचा नागरीकांना योग्य दरात व पुरेशा उपलब्ध होतो की नाही याचा अहवाल तहसिलदार यांना दिला तर सर्व सामान्याला अडचण होणार नाही. ज्या गावामध्ये अडचण आहे ते सोडविणे तालुका प्रशासनाला सोयीस्कर होईल. याप्रमाणे कार्यवाही करावी, अशी मागणी जमदाडे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

No comments:

Post a Comment