Wednesday, April 8, 2020

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती महागल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त

सुरक्षित अंतर ठेवण्याचा नागरिकांना पडला विसर
जत,(प्रतिनिधी )-
जत शहरातील किराणा दुकान,एटीएम,भाजीपाला दुकानावर कोरोनो विषाणूच्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणुन सुरक्षित अंतर  ठेवणे आवश्यक असताना नागरिक मात्र एकच गर्दी करताना दिसून येत होते. शहरातील किराणा दुकानातील जीवनावश्यक वस्तंच्या किमती वाढल्याने  सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाल्याच चित्र पहायला मिळत आहे. शहरात ठोक व किरकोळ किराणा विक्रेत्याचे जवळपास १०० च्यावर दुकाने आहेत.कोरोनाच्या  पाश्वभूमिवर संपूर्ण भारतात लाकडाऊन करण्यात आल्यामुळे नागरिक किराणा मालाची खरेदी करण्यासाठी दुकानावर एकच गर्दी करीत आहे.
ठोक किराणा विक्रेते तुटवडा निर्माण झाल्याचे भासवून किरकोळ किराणा दुकानदारांनाच फसवणूक करीत असल्याने नाईलाजाने ग्रामीण भागासह शहरातही अवाच्या सव्वा दर आकारुन  एक प्रकारे सर्वसामान्य नागरिकांची लूटच करीत आहे.सर्व कामे ठप्प पडल्याने मजूर कामगार वर्ग हतबल झाला आहे. मात्र दुसरीकडे किराणा दुकानदाराच्या मनमानी  कारभारामळे आज सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.शहरात साखरेचेभाव ३५ रुपये असताना ४०
रुपये दर आकारला जातो.तेल ९५रु.दर असताना ११० रु..शेंगदाणे १२० रु.दर असताना१५० रु.,साबुदाणा ७० रु.दर असताना १०० रु., मुरमुरा३०रु.दर असताना
तसेच काज.बदामाच्या किमतीही गगनाला भिडल्या आहे. तरी प्रशासनाने चढ्या दराने जीवनावश्यक वस्तंची विक्री करणाऱ्या किराणा दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरीकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment