Friday, April 10, 2020

भीमाशंकर होर्तीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अन्नधान्य वाटप

उमदी,(वार्ताहर)-
 कै. भीमाशंकर कल्लापा होर्तीकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त उमदी येथील गोरगरीब व गरजू लोकांना सर्वोदय किसान बहुउद्देशीय संस्थेतर्फे धान्य वाटप करण्यात आले. यावेळी अँ. चन्नाप्पा होर्तीकर, अध्यक्ष रेवाप्पाण्णा लोणी, उपाध्यक्ष अरुणकुमार होर्तीकर व सर्व संचालक उपस्थित होते. 
 २५ वर्षापुर्वी कै. भीमाशंकर होर्तीकर यांनी आपल्या मोजक्या सवगड्यानां सोबत घेऊन सर्वोदय किसान बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली होती. त्याचे अध्यक्ष होते. परंतु एक वर्षांपूर्वी त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने झाले. त्यांमुळे त्यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त संस्थेच्या वतीने अन्नधान्य वाटप केले.यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर कलम 144 अंतर्गत अचारसहिंता व जमावबंदीचा आदेश आहे. त्यामुळे मोलमजुरी व दुकानात काम करीत असलेल्या कामगारांना कामावर सुट्टी आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जगणे कठीण झाले आहे. गरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचा विचार करून संस्थेच्यावतीने गावातील व बाहेरून आलेल्या गरीब व गरजू लोकांना धान्याचे व  संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी 50 हुन अधिक कुटुंबाला अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी सर्व संचालक मंडळी यांनी दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त गरजु लोकांना मदत करण्याचा निर्धार केला.

No comments:

Post a Comment