Monday, April 13, 2020

रिक्षा चालक-मालकांना आर्थिक मदत करण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सगळीकडे संचारबंदी करण्यात आल्याने अनेक छोटे व्यावसायिकांचा धंदा बंद झाला आहे. यात रिक्षा व्यवसाया आज त्यांची उपासमार सुरू असून राज्य शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे (ए गट)शहराध्यक्ष गणेश आबासाहेब ऐवळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. चाही समावेश आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये व देशामध्ये कोरोना महामारीमुळे संपूर्ण भारत लॉकडाऊन असून गेली १५ ते २० दिवस संपर्ण भारत देश घरामध्ये आहे . त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील रिक्षा चालक रिक्षावर उदरनिर्वाह करतात .  गेली २० दिवस घरातुन रिक्षा बाहेर निघु शकली नाही. त्यामुळे रिक्षा चालकामध्ये उपासमारीची वेळ आली आहे . तरी राज्यातील रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱयांना  शासनाने मदत करावे, जेणे करून रिक्षा चालक आर्थिक संकटातून  बाहेर निघतील. शासनाने राज्यातील रिक्षा चालक यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना अन्नधान्य व इतर जगणेचे साहित्य किंवा आर्थिक मदत देणेची व्यवस्था करावी , अशी मागणी श्री. ऐवळे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment