Wednesday, April 15, 2020

भिवर्गीत मंदिरातील दानपेटी पळवली

(फाईल फोटो)
संख,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील भिवर्गी येथील ग्रामदैवत श्री बिळेणसिद्ध देवस्थानातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली . त्यामुळे भिवर्गीत खळबळ उडाली  आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्री बिळेणसिद्ध देवस्थान मंदिर गावापासून दीड किलोमीटरवर बनामध्ये आहे . जवळ वस्ती नाही . सध्या ' कोरोना ' च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आहे . त्यामुळे वर्दळ कमीच होती .
सोमवारी रात्री आठच्या दरम्यान वाऱ्यासह पाऊस झाला . वीजपुरवठा खंडित झाला , अज्ञातांनी मंदिरातील दानपेटी लंपास केली. त्यातील रक्कम  काढून घेऊन करजगी हद्दीतील ओढा पात्रात रिकामी पेटी टाकली . सकाळी गावकऱ्यांना माहिती मिळाल्यावर  हा प्रकार उघडकीस आला .सदर दानपेटी ही वजनाने जास्त असून ती एका - दोघाला न उचलणारी आहे . पाच - सहा जणांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे .

No comments:

Post a Comment