Thursday, April 2, 2020

जत तालुक्यातील गोंधळेवाडीत तरुणाचा खून

जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथील जमीन व रस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला . सुशांत खंडू गळवे ( वय 19 ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे . याप्रकरणी म्हाळाप्पा गळवे , तुकाराम गळवे , पांडुरंग गळवे , एकनाथ गळवे , बिराप्पा गळवे यांच्याविरुद्ध उमदी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

उमदी पोलिसांनी संशयित म्हाळाप्पो , एकनाथे , बिराप्पा या तिघांना अटक केली आहे . तुकाराम , पांडुरंग हे फरारी झाले आहेत . सुशांत व संशयित पाच तसेच अन्य लोकांचे शेतजमीन व रस्त्याच्या कारणावरून वाद होता . मंगळवारी सुशांत हा घरासमोर बसला होता . त्यावेळी त्याचे चुलत भाऊ तुकाराम गळवे म्हाळाप्पा गळवे , पांडुरंग गळवे , एकनाथ गळवे , बिराप्पा गळवे तेथे आले . त्यांच्यात वादावादी झाली . त्यानंतर पाचही जणांनी सुशांतला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली . त्यावेळी भांडणे सोडविण्यास गेलेले खंडू लक्ष्मण गळवे यांनाही मारहाण करण्यात आली . या मारहाणीत सुशांत गंभीर जखमी झाला . त्याला मिरजेतील वॉन्लेस रुग्णालयात दाखल करण्यात आले . उपचार चालू असताना गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले . सुशांत याचा मृतदेह गोंधळेवाडी येथे आणण्यात आला . त्यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे , सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली . याबाबत विलास गळवे यांनी फिर्याद दिली आहे . तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव दांडगे करीत आहेत .

No comments:

Post a Comment