Thursday, April 23, 2020

अजिंक्यतारा प्रतिष्ठानच्यावतीने मुख्यमंत्री सहायत्ता निधीस मदत

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत येथील अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीस ११ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. प्रतिष्ठानच्यावतीने नुकताच ११ हजारांचा आर्थिक मदतीचा धनादेश प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आशिष  येरेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे. यातच राज्याचा महसूलही कमी गोळा होता आहे. राज्यावरील आर्थिक ताण कमी करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी आर्थिक मदत गरजेची आहे. व्यापारी, उद्योजक, सरकारी कर्मचारी राज्याच्या मुख्यमंत्री आर्थिक मदतनिधीस आपापल्या परीने आर्थिक मदत करत आहेत.  या अनुषंगाने मुख्यमंत्री मदत निधीस ११ हजारांची मदत करण्यात आली.  अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानच्यावतीने प्रतिष्ठानचे विश्वस्त, मानद सचिव व कुंभारी येथील कापड व्यापारी सुनील शिंदे यांनी हे नियोजन केले. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव, दिलीप भोर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment