Saturday, April 11, 2020

'स्माईल फौंडेशन' च्यावतीने जीवनावश्यक वस्तू वाटप

जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील गरीब व गरजू कुटुंबांना तसेच स्थानबदध करण्यात आलेल्या व निराधार कुटुंबांना 'स्माईल फौंडेशन'तर्फे जीवनावश्यक वस्तू ,किराणा माल,भाजीपाला वाटप करण्यात आला. शिवाय दररोज 40 जेवण डब्यांचे वाटप केले जात आहे. कोरना कॉविड-19 ला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग दिवस-रात्र कर्तव्य बजावत आहे. त्यांच्या टीमला 'स्माईल फौंडेशन' तर्फे सरबत, पाणी, नाश्ता व उपवासाचे पदार्थ  वाटप केले जात आहेत. त्यामुळे फौंडेशनच्या कामाची सर्व स्तरातून व जत मधील नागरिकांतून समाधान व कौतुक होत आहे.

सध्याची  परिस्थिती पाहता कॉविड-19 विषाणूचा अतिरेक वाढत चालला असल्यामुळे देशात लॉक डाऊन कालावधी वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पण ह्या परिस्थितीत गरीब व गरजू तसेच हातावरचे पोट व स्थानबद्द कुटुंबाची होणारी वाताहत पाहून जत मधील 'स्माईल फौंडेशन' पुढे सरसावली आहे. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तूचे 105 कुटुंबांना किट वाटप करण्यात आले असून त्यांना एक महिना पुरेल असे धान्याचे वाटप सुरू केलेे आहे. अजून अनेक कुटुंबास किट देण्याचा उद्देश स्माईल फौंडेशनचा असून व तसेच लोकांना एक हात मदतीचा द्यावा, असे आवाहन सामाजसेवक पवन मोरे व त्यांच्या सहकार्य मंडळींकडूनकडून करण्यात येत आहे. लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर आज आपले कर्तव्य समजत व सामाजिक बांधिलकी जपत कुटुंबास धान्याचे किट वाटप करण्यात आले.
यावेळी पवन श्रीकांत मोरे, करण मोरे, मनोज सूर्यवंशी, दिनेश जाधव, अमित कोळी, प्रवीण सरगर, केंचराव डोंबळे, अर्जुन गुरव, रतन मोरे,पांडुरंग कांबळे, सनी मोरे, अजय भिसे, विशाल चौगुले, हरिदास चौगुले, सचिन मोरे व पत्रकार शशिकांत हेगडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment