Thursday, April 16, 2020

दोन चिमुरड्या मुलांसह विवाहितेची आत्महत्या

जत तालुक्यातील नवाळवाडी येथील घटना
जत,(प्रतिनिधी)-
माहेरी कर्नाटकातील विजयपूर येथे जाण्यासाठी सोडत नसल्याचा राग मनात धरून नवाळवाडी (ता.जत) येथील विवाहितेने दोन मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक आणि खळबळजनक घटना आज गुरूवारी दुपारी उघडकीस आली.

बेबीजांन इब्राहिम नदाफ (वय 32),जोया इब्राहिम नदाफ (वय 5),सलमान इब्राहिम नदाफ (वय 3)असे मुत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.बेबीजान यांचे कर्नाटकातील विजापूर हे माहेर आहे. सध्या लॉक डाऊन असल्याने वाहने बंद असल्याने गावाला सोडता येत नव्हते. त्यातच विजयपूर येथे कोरोना रुग्ण वाढल्याने सीमा पोलिसांकडून बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे माहेरी सोडता येत नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या व्यतिरिक्त आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. याप्रकरणी जत पोलीसात नोंद दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
शवविच्छेदणासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात तिघांचे मृतदेह आणण्यात आले. रात्री ९ वाजेपर्यंत शव विच्छेदनाचे काम सुरू होते. मातेसह दोन मुलांसह आत्महत्येचा प्रकार घडल्याने नवाळवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच लहान मुलांच्या मृत्यूमुळे हळहळही व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment