Tuesday, April 14, 2020

काष्ट्राईब संघटनेच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंती साजरी

सर्वोत्तम कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनाचे केले अभिनंदन!
(काष्ट्राईब महासंघव्यवतीने पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राधकीसन देवढे,गणेश मडावी आदी उपस्थित होते.)
सांगली,(प्रतिनिधी)-
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, कास्ट्राईब शिक्षक संघटना आणि कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना जिल्हा सांगलीच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती महासंघाचे कार्यालय जिल्हा परिषद सांगली येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे , वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी  यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

यावेळी मडावी म्हणाले की, संपूर्ण भारतासह जगात  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोजक्या पदाधिकारी समवेत साजरी करण्यात येत आहे. राज्यशासनाच्या वतीने करीत असलेल्या अमलबजावणी कार्यामध्ये डॉक्टर, नर्स, पोलीस यंत्रणा, सफाई कामगार, आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी हे आहोरात्र सेवा देणारे अधिकारी कर्मचारी त्याच्या कार्याला आम्ही सलाम करतो. राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांनी चोवीस तास जनतेसाठी दक्ष राहून प्रामाणिकपणाने आपले कर्तव्य पार पाडत आहेत त्याबद्दलही महासंघाचे वतीने त्यांचेही विशेष अभिनंदन करीत आहोत. याशिवाय सांगलीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी  अभिजित चौधरी, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, सिव्हिल सर्जन संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी भूपाल गिरीगोसावी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह  विविध विभागाचे सर्वच अधिकारी, कर्मचारी अविरत कष्ट घेऊन अभूतपूर्व उपायोजना, मदत कार्य, नियोजन, आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी करीत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार विविध गोरगरीब गरजू लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहसाठी अनेक उपाययोजना जाहीर केले आहे.
 जिल्ह्यात कोरोना व्हायरस नियंत्रणात आणल्याबद्दल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच्या निमित्ताने काष्ट्राईब महासंघाच्या वतीने सर्वांच्या कार्यास सलाम करून अभिनंदन करीत असल्याचे मडावी यांनी जाहीर केले .     
तसेच यावेळी "सर्वांनी घरी राहायचं कोरोनाला हरवायचं" या घोषणेचे काटेकोरपणे पालन करावे  असे जयंतीच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील तमाम जनतेस विनंतीवजा आवाहन  करण्यात आले.  जगावरील आणि देशावरील कोसळलेला कोरोनाचा महासंकट लवकरात लवकर दूर होऊन  देशातील जनता सुरक्षित राहण्यासाठी प्रार्थना करण्यात आले. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष  प्रमोद काकडे, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना उपाध्यक्ष दीपक बनसोडे, कास्ट्राईब अपंग युनिटचे अध्यक्ष अनिल राजमाने, सचिव विजयकुमार साळे, आदित्य काकडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment