Wednesday, April 8, 2020

रुग्णांच्या नातेवाईकांना शिव भोजन थाळी वाटप

जत,(प्रतिनिधी)-
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. संचारबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक रूग्ण म्हणून खाजगी रुग्णालयात  तसेच स्त्री रूग्णालयांमध्ये भरती असताना त्यांच्या नातेवाईकांना सद्याच्या संचारबंदीच्या वातावरणात अत्यंत हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. अशा रूग्णांच्या नातेवाईकांना सामाजिक दायीत्व म्हणून कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी रुगणांच्या नातेवाईकांना शिवभोजन थाळी वाटप करत आहेत.

 कामगार सेना व लायन्स क्लब कडून जत मधील माऊली हॉस्पिटलचे डाॅ. नितीन पतंगे, जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. शरद पवार, उमा हाॅस्पिटलचे डॉ. रविंद्र आरळी याठिकाणी असलेल्या रुगणांच्या नातेवाईकांचे संचारबंदीच्या काळात हाल होत आहेत. कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे, लायन्स क्लब विभागीय अध्यक्ष राजेन्द्र आरळी, माजी तालुका शिवसेना प्रमुख मलकारी पवार यांच्या हस्ते या हाॅस्पिटल मधील गोरगरीब गरजू पेशंट व लोकांना शिवथाळी पार्सल वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रिय शिवभोजन योजना राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व तालुकास्तरावर यांची व्याप्ती वाढवण्यात आली असून ती कोरोना च्या पार्श्वभूमीवर पाच रूपयात ही थाळी मिळत आहे. शिवभोजन थाळी ही जत तालुक्यात एस टी कॅन्टीन मध्ये सुरू करण्यात आली असून याचा जत तालुक्यातील लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दिनकर पतंगे यांनी केले आहे. दिनकर पतंगे हे सतत गोरगरीब जनतेसाठी दानशूर व्यक्ती मत्वाने धावून येतात व पतंगे यांना वेळोवेळी महाराष्ट्र राज्य कामगार सरचिटणीस कारमपुरी महाराज व जत तालुका संपर्क प्रमुख तानाजी गुरव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

No comments:

Post a Comment