Monday, April 6, 2020

बँक कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण द्यावे

विकास साबळे
जत,(प्रतिनिधी)-
कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या सर्वत्र अगदी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे, तरीही अत्यावश्यक सेवा म्हणून विविध बँकातील अधिकारी,कर्मचारी अखंडित काम करत आहे.जनतेच्या सेवेसाठी ते राबत आहे.त्यांनाही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे शासनाने पोलीस आरोग्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रमाणे बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांना ५०लाखाचे विमा संरक्षण द्यावे,अशी मागणी रिपाईचे सांगली जिल्हाउपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.

राज्यभरात कोरोनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन
असतानाही शहरी,ग्रामीण भागातील सर्व राष्ट्रीयकृत, अर्बन,खाजगी बँका सुरू आहेत. त्या राबणारे अधिकारी, कर्मचारी एकप्रकारे या महामारीत स्वतःचे जीव धोक्यात घालून देश सेवा करत आहेत. त्यांनाही या कोरोना विषाणुचा मोठा धोका संभावू शकतो. प्रत्येक बँकेत दररोज शेकडो लोक येत असतात. कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भिती असताना सुद्धा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी लोकांच्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे शासनाने या कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा संरक्षण द्यावे.त्याशिवाय या कोरोना महामारीत जीव धोक्यात घालून राबणाऱ्यांना सर्वांना शासनाने विम्यासह सुरक्षेसाठी संरक्षण द्यावे,अशीही मागणी साबळे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment