Saturday, April 18, 2020

सोन्याळ येथे कोरोनाविषयी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण

(व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण घेताना पदाधिकारी आणि कर्मचारी वर्ग)
सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-         
जत तालुक्यातील सोन्याळ येथे संरपच, उपसंरपच, ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा वर्कर्स,  इतर कर्मचाऱ्यांना कोविड १९ विषाणू संदर्भात ऑनलाइन प्रशिक्षण (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) देण्यात आले.सांगली जिल्हा परिषद येथून या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करण्यात आले.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
सरपंच सौ संगीता निवर्गी,ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सोन्याळ येथील श्री विजय विठ्ठल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळत प्रशिक्षणासाठी  व्यवस्था करण्यात आली होती. या प्रशिक्षण कार्यक्रमात कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना काय ? क्वारंटाइन आणि आयसोलेशन याच्यात काय फरक आहे ? गरम पाण्यात विषाणू मरतो का? कोणत्या रूग्णांना या आजाराचा जास्त धोका संभवतो? आदी विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ निवर्गी,उपसरपंच सुमन कांबळे,ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार, जक्कु निवर्गी, तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल बिरादार, विजयकुमार बगली, काडसिद्द काराजनगी,दयानंद मुचंडी, अभिजित कांबळे, आणि सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक व केंद्रचालक हे उपस्थित होते.प्रशिक्षण पार पाडण्यासाठी हायस्कूलचे जकप्पा बिरादार, रामणा मुचंडी, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक ऐवळे, डाटा ऑपरेटर सौ कविता सनोळे, अमृत सनोळे, बिराप्पा पुजारी,भीमणणा पुजारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment