Monday, April 20, 2020

इफको संस्थेतर्फे सोन्याळमध्ये सुरक्षा किटचे वाटप

( इफको कंपनीकडून सोन्याळ ता जत येथे गरीब गरजू लोकांना जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवी-पाटील यांच्याहस्ते  सुरक्षा  किटचे वाटप करण्यात आले.)
सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जगातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या ईफकोद्वारे  'ईफको का है नारा, कोरोना को है हराना' ह्या उद्धिष्टाला उराशी बाळगून ईफको संस्था कोरोना संसर्ग प्रादुर्भाव निर्मूलन अंतर्गत  जत तालुक्यातील सोन्याळ परिसरातील ग्रामस्थ, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, डॉक्टर, पत्रकार, बँक कर्मचारी, एम एस ई बी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, दुकानदार, ग्रामपंचायत सदस्य, शिपाई, वॉटरमॅन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना  ५०० मास्क,५०० साबण  व २०० व्हिटॅमिन 'C' च्या गोळ्या  जि.प. माजी आरोग्य सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी माजी सभापती तम्मनगौडा रवि-पाटील ईफकोचे आभार मानताना म्हणाले कि ह्या कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी ईफकोने चालू केलेलं "ब्रेक द कोरोना चैन" अभियान खरोखर वाखाणण्याजोगी आहे व संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात ईफको सारख्या संस्थेमार्फत राबवण्यात  येणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने  दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन पालन करूया, घरी राहूया आणि सुरक्षित राहूया तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून  कोरोनावर मात करण्याचे आवाहन रवी - पाटील यांनी केले. या प्रसंगी सोन्याळचे सरपंच सौ संगीता जक्कण्णा निवर्गी, उपसरपंच  सौ सुमनताई कांबळे, डॉ शिवानंद बगली,ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार बगली, काडसिद्द काराजनगी, दयानंद मुच्चडी, सोमनिंग पुजारी, तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल बिरादार, सिदराय उमराणी, लखन  होनमोरे,चिदानंद बिरादार, महादेव उमराणी, सांगू पुजारी, सुरेश तेली, सुरेश माडग्याळ, राजकुमार शिंदे आदी  उपस्थित होते.   
कार्यक्रमाचे आयोजन ईफकोचे अधिकारी नितीन उमराणी यांनी राज्य विपणन व्यवस्थापक एस डी नायब व सांगली जिल्हा क्षेत्रीय अधिकारी डॉ.एम एस पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. ईफको संस्था भारतभर कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वाटप भारतातील सर्व राज्यांमध्ये करीत आहे व  पीएम केयर फंडमध्ये २५ करोड रु.ची मदत तसेच महाराष्ट्रातील संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी २ लाख रु.ची मदत केली आहे. शिवाय सांगली जिह्यात या आधी विविध ठिकाणी जनजागृती व कोरोना प्रतिबंधक किट वाटप अभियान राबवले गेल्याचे व आणखीन  काही ठिकाणी कोरोना प्रतिबंधक किट वाटप करणार असल्याचेही नितीन उमराणी यांनी  सांगितले.

No comments:

Post a Comment