Friday, April 17, 2020

सोन्याळ ग्रामपंचायततर्फे सॅनिटायझर,मास्क व प्रोत्साहन भत्ता वाटप

(ग्रामपंचायत सोन्याळतर्फे  सरपंच व उपसरपंच यांच्याहस्ते मोफत सॅनिटाईजर,मास्क व आशा वर्कर्सना प्रोत्साहन भत्ता वाटण्यात आले. )
सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)
कोरोनाच्या साथीमध्ये खेडोपाडी आरोग्यसेविका आशा सेविका,अंगणवाडी सेविका,मदतनीस घरोघरी जात सर्वेक्षण करत आहेत. त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सोन्याळ  ग्रामपंचायततर्फे सरपंच सौ संगीता निवर्गी,उपसरपंच सौ सुमन कांबळे व ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार यांच्याहस्ते मोफत हँड सॅनिटायजर, मास्क व प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहन म्हणून मानधन वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  या घातक रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा जीवतोड मेहनत घेत आहे.सोन्याळ (ता. जत) येथे कर्मचाऱ्यांसोबत ग्रामीण भागात अंगणवाडी व आशा सेविकाही मोलाची कामगिरी बजावत आहेत. उन्हातान्हातून घरोघरी जात आशासेविका सर्वेक्षण करत आहेत. आशा आणि आरोग्य सेविकांच्या या समाजसेवेच्या कृतज्ञतेपोटी ग्रामपंचायततर्फे मोफत हँड सॅनिटायजर आणि मास्क सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच सौ सुमन कांबळे यांनी आशा सेविकांना कोरोना साथीत काम करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयीही सूचना केल्या. अगदी तुटपुंज्या मानधनावर या आशासेविका काम करत आहेत. कोरोना साथीत आशा सेविकांना काम केलेल्या कालावधीत त्यांना शासनाने प्रत्येकी ५ हजार प्रोत्साहन भत्ता द्यावा अशी मागणीही सौ सौ कांबळे यांनी केली. आपल्या कामची दखल समाजातून घेतली जात असल्याबद्दल अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जक्कु निवर्गी,ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार बगली कडसिद्द काराजनगी, दयानंद मुचंडी, सैफद्दिन नदाफ,सोमनिंग पुजारी, बजरंग गारळे, जकव्वा मुचंडी,सखुबाई गारळे,तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल बिरादार,  राजकुमार शिंदे,लखन होनमोरे, अभिजित कांबळे, अशोक ऐवळे, सौ. कविता सनोळे बिराप्पा पुजारी यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा आणि अंगणवाडी सेविका व  मदतनीस आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment