Monday, April 6, 2020

जत तालुक्यात दोन वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली

३ लाखाचा दंड 
जत,(प्रतिनिधी)-
वाळेखिंडी ता.जत येथे रविवारी मध्यरात्री विना परवाना वाळू उत्खनन करून वाहतू करीत असताना दोन वाहने पकडण्यात आली.सदरची कारवाई कुंभारीचे मंडळ अधिकारी नंदकुमार बुकटे यांच्या पथकाने केली .दोन्ही वाहनाना 3 लाख रुपये दंड करण्यात आले असल्याची माहिती मंडळ अधिकारी नंदकमार बुकटे यांनी दिली.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात गस्त घालत असणारे कुंभारीचे मंडळ अधिकारी नंदकुमार बुकटे यांनी ही कारवाई केली. रविवारी मध्यरात्री 12 वाजता वाळेखिंडी येथील भवानी डोंगराजवळ विना परवाना वाळू उत्खनन करून वाळूची वाहतूक करणारे वाळेखिंडी येथील नवनाथ भाऊसाहेब शिंदे यांचा महिंद्रा ५७५ कंपनीचा ट्रँक्टर नं एम एच  १० सी एक्स २९२१ तसेच पवन तात्यासाहेब शिंदे यांचे मालकीचा ४०७ टाटा कंपनीचा टेम्पो क्र. एमएच.0९.एल ३९३१ ही दोन्ही वाहने कुंभारीचे मंडळ अधिकारी नंदकुमार बुकटे , वाळेखिंडीच्या तलाठी श्रीमती अंजिरा जाधव, कोसारीचे तलाठी निखील पाटील यांच्या पथकाने पाठलाग करून पकडली. ही कारवाई प्रांताधिकारी प्रशांत आवटी, तहसिलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

No comments:

Post a Comment