Thursday, April 23, 2020

तीन महिन्यांपर्यंतची विद्युत देयके माफ करण्याची करा

कामगार सेनेचे दिनकर पतंगे यांचे उर्जामंत्र्यांना निवेदन
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना सारख्या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी राज्यातील जनतेला दिलासा देणारे जनतेच्या हिताचे अनेक महत्वपुर्ण निणय महाराष्ट्र विकास आघाडी शासनाने घेतले आहेत. यात ऊर्जा खात्यांतर्गत लॉकडाऊन कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीज बिलातील स्थिर आकार पुढील तीन महिन्यासाठी स्थगित करून राज्यातील नागरिकांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे.
मात्र यावर राज्यातील गरीब जनतेला तीन महिन्यांपर्यंत विद्युत देयकामध्ये माफी देत तीन महिन्यांचे विद्युत देयके रद्द करण्याची मागणी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांचेवतीने राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांना निवेदन पाठवून करण्यात आली आहे. कोरोना संकटकाळात गरीब माणूस घरी बसला असल्याने त्यांच्यासमोर प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले आहे. हातावर पोट असलेल्या गोरगरीब, सामान्य माणसांच्या समोर प्रचंड अडचणी आहेत. दररोजच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सुध्दा सर्वसामान्य माणसाजवळ आता राहिली नाही. अशा परिस्थितीमध्ये घरगुती वीज बिल भरणे त्यांना अशक्य आहे. म्हणून तीन महिन्यापर्यंत त्यांचे विद्युत देयक माफ करून त्यांना जगण्याची संधी देण्याची मागणी निवेदनात श्री.  पतंगे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment