Monday, April 6, 2020

उमराणीत युवकाचा शेततलावात बुडून मृत्यू

जत,(प्रतिनिधी)-
उमराणी ता.जत तरूणाचा शेततलावात पाय घसरून पडल्याने बुडून मुत्यू झाला.बसवराज शिवाजी वाघमारे (वय 19)असे मयत तरूणाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,बसवराज यांने नुकतीच दहावीचे परिक्षा दिली आहे.सुट्या असल्याने तो शेळा राखत होता.सोमवारी तो रोजच्याप्रमाणे शेळ्या राखण्यासाठी गेला होता.तहान लागल्याने बिराजदार यांच्या शेततळ्यात पाणी आणण्यासाठी उतरला.त्यात त्याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात बुडाला.
पोह्यायला येत नसल्याने त्याचा बुडून मुत्यू झाला.बऱ्याच वेळ झाला तरी घरी परतला नाही.म्हणून त्याची शोधाशोध घेतला असता हा प्रकार समोर आला.दरम्यान याबाबत अद्याप जत पोलीसात या घटनेची नोंद  झालेली  नव्हती.

No comments:

Post a Comment