Wednesday, April 22, 2020

उमदीत कुटुंबांना व शासकीय कर्मचाऱ्यांना पतसंस्थेतर्फे मास्क वाटप

उमदी,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील उमदी येथे बिगर शेती सहकारी पतसंस्थेवतीने गावातील व वाड्यावस्तावरील सर्व कुटुंब तसेच सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांना संस्थेचे अध्यक्ष विष्णू निळे, उपाध्यक्ष महादेव होर्तीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, अँड. चन्नाप्पा होर्तीकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन मास्कचे वाटप करत जनजागृती केली.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर लाॅकडाउन करण्यात आले आहे. जत तालुक्यातील गोरगरीब जनतेला विविध स्तरातील दानशूर व्यक्तीकडून मदत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आवाहनानंतर त्यांच्याशी निकटवर्तीय व घरगुती संबंध असणाऱ्या होर्तीकर कुटुंबियांनी त्यांच्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून धान्य वाटप, फळ वाटप, शासकीय कर्मचारी यांना चहा-नाष्टा तसेच जेवणाची व्यवस्था आदीसह वेगवेगळे उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. तसेच उमदी येथील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ही देखील लोकांच्या मदतीला धावून आली आहे. उमदी गावातील व वाड्यावस्तावरील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीस मास्क वाटप करण्यात येत आहेत. तसेच सरकारी दवाखाना, वीज वितरण, पोलिस ठाणे , विविध बँका येथील कर्मचारी यांच्यासह दुकाणदार, डॉक्टर यांना एकूण सात हजाराहून अधिक मास्क वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष महादेव होर्तिकर यांनी दिली. यावेळी माजी जि.प.अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर,सचिव अरविंद सौदी, संचालक पिरसाब जमादार, रेवाप्पाण्णा लोणी, परमानंद पाटील, सिद्राया तळ्ळी, सिध्दू लोणी, उल्हास माळी, कल्लापा शिरगड्डी,शारदा धोत्री या सर्वानी प्रत्येक कुटुंबापर्यंत जावून मास्कचे वाटप केले.
उमदी येथील राजारामबापू पाटील यांच्या पासून मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय व घरगुती संबध असणाऱ्या होर्तीकर कुटुंबीयांनी मंत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी येथे १९८९ साली  ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था स्थापन केली. या पतसंस्थेच्या माध्यमातून दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येते तसेच जळीत कुटुंबास मदत करणे, कल्याणनिधी देणे तसेच सर्व सभासदांचा विमा उतरवला गेला आहे. सुप्रिया सुळे व मंत्री जंयत पाटील यांच्या उपस्थितीत  सामुदायिक विवाह सोहळाही करण्यात आला आहे. आता कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मास्क वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment