Saturday, April 18, 2020

कारवाईच्या भीतीने व्हाट्सएप ग्रुप 'लॉकडाऊन'

ग्रुप अॅडमीनची सावधगिरीची भूमिका
जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
आजच्या संगणकीय युगात व्हॉट्सोंप हे माहीती आदान प्रदान करण्याचे प्रभावी माध्यम आहे. परंतु कोरोना विषाणु जन्य आजाराच्या संकटामध्ये आक्षेपार्ह मजकूर,  चुकीची माहिती, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे संदेश पाठविणा-या नागरिकांच्या विरोधात शासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे बहुतांश ग्रुप अँडमीन यांनी केवळ आपलीच पोस्ट पाठविता येईल अशी भ्रमणध्वनी मध्ये सेटिंग करून बदल केला आहे.
त्यामुळे ग्रुपवर येणाऱ्या संदेशाच्या प्रमाणात मोठी घट आली असल्याने ग्रुप सुद्धा कोरोणा संचार बंदीच्या काळात 'लॉकडाउन' झाल्याचे दिसत आहे.
अलीकडे सर्व कुटुंबाकडे स्क्रीनटच मोबाईल पोहोचला आहे. अनेक भ्रमणध्वनी धारक विविध व्हॉट्सप ग्रुपचे सदस्य आहेत. यामधील काही सदस्य आपल्याकडे येणा-या संदेशाची कोणतीही शहनिशा न करता व्हॉट्सअॅप ग्रुपवर परस्पर पाठवताना दिसतात. कोरोणा या विषाणु जन्य आजाराच्या संकट काळात अफवा, आक्षेपार्ह व संदेश पसरविणाऱ्या संदेशामुळे सार्वजनिक कायदा व सव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असतो. अशा संकट काळात चुकीचा संदेश पोहोचू नये, यासाठी सायबर क्राईम कडून व्हाट्सअप ग्रुप तपासण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे व्हाट्स अप ग्रुप अड्मिनने ग्रुप मधील इतरांना संदेश पाठ्विता येऊ नये यासाठी लॉक केले आहे. त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपवर येणारे संदेश कमी झाले आहेत. ग्रुप मधल्या अन्य सदस्यांची निराशा झाली आहे.

No comments:

Post a Comment