Monday, April 6, 2020

शिक्षक बँकेने कर्जाचे व्याजासह हप्ता स्थगित करावे

गांधी चौगुले
सोन्याळ,(वार्ताहर)-
राज्यासह देशात कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे व्यवसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यात शिक्षक पण अपवाद नाही. राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱयांचा  मार्च महिन्याचा पगार दोन हप्त्यात द्यायचे ठरवले आहे. ते पण मार्च एंडिंगला त्रासदायक आहे.

सर्व शिक्षक सभासद शिक्षक   बँकेला कामधेनू म्हणून पहातात. प्राथमिक  शिक्षक बँकेसह  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही पुढील तीन महिन्याचे व्याजासह हप्ते स्थगित करावे आणि शिक्षक सभासदांना दिलासा द्यावा अशी मागणी जत तालुका शिक्षक संघाचे तालुका सरचिटणीस गांधी चौगुले यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
सांगली जिल्हा विकास सहकारी पतसंस्था सांगली यांनी आरबीआयच्या निर्देशानुसार सध्याच्या  आणीबाणीच्या काळाचा विचार करून सर्व कर्जाचे हप्ते तहकुब केली आहे. त्याचप्रमाणे शिक्षक बँक आणि सांगली जि.म.सह बँकेने सुद्धा व्याजासह पुढील हप्ते स्थगित करावे अशी  मागणी  गांधी चौगुले यांनी केली आहे. यामूळे लॉकडाऊनच्या काळात
शिक्षकांना दिलासा मिळेल.  वरील आशयाची मागणी  दोन्ही बँकेला इमेलद्वारे  केली आहे. यावेळी पार्लमेंटरी बोर्ड सदस्य फत्तुसो नदाफ, प्रमोद कोडग, बसवराज यलगार, लिंगय्या जंगम, डी के चव्हाण,विठठल कोळी,अजीम नदाफ, प्रभाकर बाबर श्रीशैल मुचंडी, आमगोडा पांढरे, सिकंदर शेख, प्रकाश घाळी, अशोक शिंदे, सिदराय केसगोंड,लकप्पा शिरगटी, राजाराम शिंदे, जी जी कुलकर्णी, धानाप्पा शिंगे, मधुकर कंभार,सिदराय चिकलगी, अण्णप्पा चिंतामणी, राजेंद्र बिरादार(उटगीकर), मलकारी होनमोरे, प्रकाश ऐहोळे,डी एम शिंदे,राजाराम इम्मनवर,शशिकुमार पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment