Thursday, April 16, 2020

वाढदिवसाचा खर्च कोरोनासाठी

 बनाळीच्या सई सावंतची मुख्यमंत्री निधीस मदत
जत,(प्रतिनिधी)-
बनाळी येथील माजी जिल्हापरिषद सदस्य व शिवसेनेचे युवक नेते संजीवकुमार सावंत यांची इयत्ता पाचवीत शिक्षण घेणारी कन्या सई हिचा  काल गुरुवारी वाढदिवस होता. मात्र वाढदिवसाच्या खर्चाला सावंत कुटुंबीयांनी फाटा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनास प्रतिसाद देत वाढदिवसानिमित्त रुपये दहा हजार दहा रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला.
संजीवकुमार सावंत यांनी दिलेला धनादेश तहसीलदार सचिन पाटील यांनी स्वीकारला.
यावेळी तहसीलदार सचिन पाटील यांनी हा धनादेश स्वीकारत संजीवकुमार सावंत यांची कन्या सई सावंत हिला हॅप्पी बर्थडे, सई.असे म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बनाळी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे युवक नेते संजीवकुमार सावंत व त्यांच्या पत्नीने मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा यासाठी पंढरीच्या पांडुरंगाला पायी चालत साकडे घातले होते. त्यावेळी या दोघा उभयतांना शपथविधी सोहळ्याला थेट मातोश्रीवरून आमंत्रण मिळालेहोते. आता सावंत यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत दिली आहे.

No comments:

Post a Comment