Wednesday, April 15, 2020

विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील डफळापूर येथील विवाहिता वैशाली अजित भोसले (वय 25) या महिलेने राहत्या घरी आज बुधवारी सकाळी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.  अद्याप या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी डॉ. अभिजीत चौथे यांनी मयत महिलेची माहिती दिली आहे. आधिक तपास हवालदार विजय वीर करीत आहेत.

No comments:

Post a Comment