Tuesday, April 7, 2020

ऍड. होर्तिकर यांच्याकडून गरीब लोकांना अन्न धान्य वाटप

उमदी,(वार्ताहर)-
उमदी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.चन्नाप्पा होर्तिकर यांनी उमदी येथील देवदासी, मागुतकरी  व ज्यांच्यावर खरीच उपासमारीची वेळ आली आहे अशा गोरगरीब कुटुंबातील लोकांना अन्नधान्य वाटप केले, माणुसकीचे दर्शन घडवत मदतीचा हात पुढे करून त्यांना सहकार्य म्हणून पंधरा दिवस पुरेल येवढे तांदूळ व  दाळीचे वाटप केले. यावेळी रेवाप्पाण्णा लोणी, पिरसाब जमादार उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लाॅकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे उमदी व परिसरातील अनेकांना काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दुकाने, हाॅटेल, खानावळ तसेच इतर व्यवसायासोबत सर्वच कामधंदे बंद झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्याच्या रोजी-रोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच बाहेरून उमदी येथे काही लहान मोठे व्यवसाय करणारे व कामकाज करण्यासाठी आलेले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कामकाज करणाऱ्या लोकांना  मात्र त्यांच्या जेवणाची सोय होत नसल्याने त्यांच्या साठी पुढे येऊन अॅड.चन्नाप्पा होर्तिकर यांनी तांदूळ,मूगदाळ,तूरडाळ व इतर साहित्य देऊन माणुसकी चे दर्शन घडवून दिले आहे. तसेच अँड. होर्तीकर यांनी उमदी पोलिस ठाणे यांना लाँकडावुन संपेपर्यंत सायंकाळी जेवणाची सोय केली आहे व महावितरणच्या सर्व कर्मचारी यांना देखील दररोज सकाळी चहा व नाष्ट्याची सोय करत जेवणासाठी सर्व साहित्य देण्यात आले आहे. त्यामुळे उमदी परिसरातून अँड.चन्नाप्पा होर्तीकर यांचे सर्व भागातुन कौतुक होत आहे.
मला अनेक गरजू लोकांनी आपल्यावरती उपासमारीची वेळ आल्याचे सांगितले. त्यामुळे मी कोणताही राजकीय हेतू न ठेवता एक सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य गोरगरीब लोकांना आपल्या पोटाची खळगी भरण्यात करिता माणुसकीच्या नात्याने तांदूळ,तेल,धान्य व इतर साहित्य देऊन मदत करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे.

No comments:

Post a Comment