Sunday, April 5, 2020

राशन कार्ड नसणाऱ्या लोकांनाही धान्य द्या

सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे 
जत,(प्रतिनिधी)-
 अनेक कुटुंबांचे रेशन कार्ड असूनही आधार लिंक झाले नसल्याने त्यांचे रेशन स्वस्त धान्य दुकानदार देत नाही. आत्ता लॉकडाऊनमध्ये ज्याचे आधार लिंक झाले नाही अगर रेशन कार्ड नसणाऱ्या लोकांना व कुटूंब यांना धान्य द्यावे, अशी मागणी यांनी जत येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केली आहे.

मागील महिन्यात सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी रेशन कार्ड नवीन देणे, रेशनकार्डात नवीन नावे घालणे यासाठी महिनाभर मोहीम उघडली होती. याचा लाभ अनेक कुटुंबानी घेतला. मात्र त्यांची आधार लिंक झाले नसल्याने त्यांना रेशन वरील धान्य मिळत नाही. अनेकजण आधार लिंक करण्यासाठी लोक रेशन दुकानदारांकडे गेले मात्र कोरोनामुळे आधार लिंक करणे बंद केल्याचे सांगितले. त्यामुळे अनेक कुटुंबाचे आधार लिंक झाले नाही. आत्ता मात्र त्यांची गोच्ची झाली आहे. त्यामुळे आधार लिंक नसलेल्या कुटुंबावर आत्ता उपासमारीची वेळ आली आहे. शासन एकीकडे कुणीही उपाशी राहणार नाही, अशी घोषणा करीत आहे मात्र अनेक कुटुंबे रेशनकार्डाअभावी उपासमारीने जगत आहेत. अशा बिगर रेशन कार्ड व आधार लिंक न झालेल्या राशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना देखील रेशन मिळणे गरजेचे आहे. तरी शासनाने रेशनकार्ड असूनही आधार लिंक नसणाऱ्या व रेशनकार्ड नसणाऱ्या रेशनवरील मिळणारे धान्य सवलतीत द्यावे, अशी मागणी विक्रम ढोणे यांनी केली आहे.

1 comment:

  1. भरपूर लोक आहेत की केशरी काडधारक आसून माल मिळत नाही

    ReplyDelete