Saturday, April 11, 2020

एकुंडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कोरोना जनजागृतीचा धनादेश

प्रत्येकी एक हजार अतिरिक्त मानधन वाटप
जत,(प्रतिनिधी)-
सध्या कोरोना विषाणूचा संपूर्ण जगभरात प्रादुर्भाव झालेला असून महाराष्ट्र राज्यात या विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या मार्फत गावात जनजागृती राबविण्याचे कार्य सुरू आहे.
आपल्या जीवाची पर्वा न करता हे सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून जनजागृती करत आहेत. वरील बाब कामाचा भाग असला तरी सदरील कर्मचारी जीवाची पर्वा न करता जोखीम पत्करून काम करीत आहेत. वेतन मानधन व्यतिरीक्त त्यांना एक हजार रुपये ग्रामपंचायतकडून देण्यात आले आहेत. या वेळी उपस्थितीत एकुंडी ग्रामपंचायतचे सरपंच बसवराज पाटील, ग्रामसेवक आर.के.माळी यांच्या हस्ते  गावातील ग्रामपंचायत कर्मचारी संतोष कोंडे, आशा वर्कर लक्ष्मी ऐवळे, शशिकला माने,  अंगणवाडी सेविका ललिता नाईक, ललिता लठ्ठी, संगिता यंगारे यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment