Wednesday, April 22, 2020

म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व तलाव भरून घ्या

आमदार विक्रम सावंत
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या पंप हाऊस सुरू करून देवनाळ व बिळूर कालव्याव्दारे पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जतचे आमदार विक्रमदादा सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली.  म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत येणारे सर्व तलाव भरून घ्या, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
 येणाऱ्या काळात पाण्याची मोठी टंचाई जाणवू शकते. यासाठी मागणी असेल त्या ठिकाणी पाणी सोडा. संचारबंदीने व अवकाळी पावसाने शेतक-यांना आर्थिक संकटातून जावे लागत आहे. या संकटात शेतक-्यांना पैशांचा तगादा लावू नका, मागणी असेल त्याठिकाणी म्हैसाळ योजनेचे पाणी सोडा, असे आदेश आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिले.
गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने
योजनांना मंजुरी दिली. मात्र, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणाऱ्या योजना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ठेकेदारांवर अधिकाऱ्यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. २५ ते २६ कामे रखडली असून, अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ज्या गावात अपूर्ण काम आहे, त्यांच्यावर कारवाई करा व ती कोट्यवधी रुपयांच्या कामे पूर्ण करा, अशा सूचना आमदार सावंत यांनी केल्या. जतमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पाश्श्वभूमीवर आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या वेळी तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीदार, जिल्हा परिषदेचे अभियंता सोनवणे, जिल्हा परिषदेचे सदस्य महादेव पाटील, पंचायत समितीचे सदस्य दिग्विजय चव्हाण, म्हैसाळ योजनेचे व पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
डफळापूर हद्दीतील मिरवाड तलावासह परिसरातील तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी पंचायत समितीचे सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी केली. यावर आमदारांनी, अधिकार्यांनी सद्य:स्थितीत तालुक्यात असणारा पाणीसाठा लक्षात घेता मिरवाड, बिळूर, केसराळ, काळेशिवार, सनमडी यासह तलावात पाणी सोडण्याचे आदेश दिले.

No comments:

Post a Comment