Sunday, April 19, 2020

रेशन कार्ड नसणाऱ्यांना मोफत धान्य द्यावे


श्रीशैल बिराजदार
जत ( जत न्यूज वृत्तसेवा)-
ज्या कुटुंबियांकडे अद्यापही शिधापत्रिका नाहीत. अशा कुटुंबियांना शासनाच्यावतीने स्वस्त धान्य पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जत तालुक्यातीलउमदी खालील विठ्ठलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार यांनी केली आहे. तालूक्यातील प्रत्येक गावागावात अनेकांजवळ शिधापत्रिका नसुन ते स्वस्त धान्यापासुन वंचित
राहात आहेत. कोरोना संकटांने देशालाच नव्हेतर जगाला वेठीस धरले आहे. तेंव्हा जनजीवन पुर्णपणे विस्कटुन गेले आहे.
या भयानक कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने ३ मे पर्यंत लॉक डाऊन घोषीत केले. १४४ कलम संचारबंदी लागू असून नागरिक काटेकोरपणे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत आहेत. मात्र गोरगरिब भुमीहिन, शेतमजूर शासनाच्या धान्य व जिवनावश्यक वस्तूंअभावी उपाशीपोटी जिवन जगत आहेत. मुंबई, पुणे, यासारख्या मोठ्या शहरातून काही नागरिक आपल्या मुळगावी पायी चालत गावात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी तपासणी करून घेतली आहे; मात्र यांच्याकडे शिधापत्रिकाच नसल्याकारणाने अनेक तालुक्यांमधील गावात यांना व अनेक कुटुबियांना स्वस्तधान्य दुकानदार धान्य देऊ
शकत नाहीत. शासनाने ज्या कुटुंबीयांकडे
शिधापत्रिका नसतील त्यांनाही धान्य देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. जनतेची अडचण बघता शासनाने लवकरच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेणेकरुन अशा नागरिकांना आधार मिळेल.
नागरिकांनीही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत कोरोना संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. तरी शासनाने रेशनकार्ड नसणाऱ्या लोकांना त्त्वरीत मोफत धान्य द्यावे, अगर सरसकट लोकांना मोफत धान्य पुरवठा शासनाने करावा, अशी मागणी बिराजदार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment