Sunday, April 12, 2020

बँकांसमोर उन्हात ग्राहकांच्या रांगा

जतमध्ये 'सोशल डिस्टन्स'चा बोजवारा
(जत-विजापूर मार्गावर असलेल्या बँक ऑफ इंडिया समोरील ग्राहकांची रांग रस्त्यावर आली आहे. बँक पहिल्या मजल्यावर आहे.)
जत,(प्रतिनिधी)-
जनधन योजना आणि शेतकऱ्यांच्या विविध योजनांमधून बँकांमध्ये ग्राहकांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी दिसून येत आहे. बँकांच्या बाहेर अगदी रस्त्यावर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. पैसे काढण्यासाठी ग्राहकांना उन्हात रस्त्यावर ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात सर्वत्र संचार बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र जीवनावश्यक गरजांसाठी पैशाची गरज लोकांना भासत असतेच. त्यातच केंद्राकडून गोरगरिबांना महिन्याला पाचशे रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. जनधन योजनेतून लोकांच्या बँक
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्केट यार्ड शाखेबाहेर उभे राहिलेल्या ग्राहकांमध्ये 'सोशल डिटन्स' दिसून येत नाही.
खात्यावर पाचशे रुपयांचा पहिला हफ्ता बँकेत जमा करण्यात आला आहे. त्यातच शेतकऱ्यांनाही काही योजनेतून पैसा जमा झाला आहे. त्यामुळे गेले काही दिवस बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. बँकेत एक एक ग्राहक सोडला जात असला तरी बँकेबाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. बाहेर रस्त्यावर या रांगा आल्या असून उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. बँकेबाहेर मात्र 'सोशल डिटन्स'चा कोणताच निर्णय पाळला जात नाही. याकडे कुणाचेच लक्ष नाही. पोलिसांचीही याकडे दुर्लक्ष होत आहे.
(उमराणी रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र समोरची ग्राहकांची अशी गर्दी दिसत आहे.)
ग्राहकांना पैसे मिळायला विलंब लागत असल्याने ग्राहकांना उन्हात रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. बँकांनी ग्राहकांना रांगेत उभे राहण्यासाठी निवाऱ्याची सोय करावी अशी मागणी होत आहे.जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आदी बँकांसमोर रस्त्यावरच ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment